मेरीकोम, युवराज करणार शबानासाठी कॅटवॉक

मुंबई, १ सप्टेंबर -लंडन ऑलिंपिकमध्ये कास्य पदक जिंकणारी भारताची महिला बॉक्सर एम.सी.मेरी कोम अनुभवी अभिनेत्री आणि समाजसेविका शबाना आजमी यांच्या मिजवां वेलफेयर सोसायटीसाठी तीन सप्टेंबर रोजी रॅम्पवर कॅटवॉक करणार आहे. या शोमध्ये कॅन्सरवर मात करून पुनरागमन करणारा टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज युवराज सिंगदेखील वाक करणार आहे.
शबानाने ट्वीट केले की, ’मेरीकोम मिजवान सोनेट इन फेब्रिकसाठी तीन सप्टेंबर रोजी रॅम्पवर वॉक करणार आहे. मुळात ती एक रोल माडल असून आमच्या मिजवां स्कूलच्या मुली अत्यंत आनंदी आहेत.
एमडब्ल्यूएस ग्रामीण भारतात मुलींच्या कल्याणासाठी काम करते.हा फॅशन शो मुंबईच्या ग्रांड हयातमध्ये अयोजित केला जाईल. २९ वर्षीय मेरी कोम अन्य बॉलीवुड अभिनेता आणि अभिनेत्रींसह रॅम्पवर वाक करणार आहे. यात दीपिका पादुकोण, करण जौहर आणि इमरान खान आदींचा समावेश आहे.

Leave a Comment