सॅमसंगचा सर्वात मोठ्या स्क्रीनचा स्मार्टफोन बाजारात

बर्लिन: अ‍ॅपलबरोबर झालेल्या न्यायालयीन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सॅमसंगने गॅलॅक्सी नोट- २ हा सर्वात मोठा स्क्रीन असलेला स्मार्टफोन बाजारपेठेत सादर केला आहे. या उत्पादनाने आयफोनशी स्पर्धा करण्यास बळ मिळण्याची आशा कंपनीला वाटते.

बर्लिन येथे आयोजित करण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक उत्पादनांच्या सर्वात मोठ्या प्रदर्शनात सॅमसंगने हा स्मार्टफोन सादर केला आहे.

अ‍ॅपलने सॅमसंगच्या विरोधात पेटंटसंबधी खटला जिंकल्यानंतर अमेरिकेत सॅमसंगच्या काही उत्पादनांवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. त्यामध्ये या नवीन गॅलॅक्सी नोट- २ चा समावेश नाही. त्यामुळे हे उत्पादन आयफोनशी तगडी स्पर्धा करेल; असा कंपनीचा विश्वास आहे.