दहशतवादाबाबत हवा ‘झिरो टॉलरन्स’

तेहरान: दहशतवाद हा संपूर्ण जगाला लागलेला भयानक शाप असून दहशतवादाबाबत ‘झिरो टॉलरन्स’ची नीती अवलंबणे आवश्यक असल्याचा इशारा भारताने दिला आहे.

अलिप्त राष्ट्र चळवळीच्या (नाम) १६ व्या अधिवेशनात परराष्ट्र मंत्री एस. एम. कृष्णा यांनी दहशतवादाबाबत चिंता व्यक्त केली. दहशतवादामुळे समाजाचा आर्थिक आणि सामाजिक स्तर खालावत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

कोणत्याही परिस्थितीत दहशतवाद खपवून घेतला जाणार नाही; असा इशारा देताना कृष्णा म्हणाले की; दहशतवादाच्या विरोधात राजकीय इच्छाशक्ती निर्माण करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय परिषदा आयोजित करणे आवश्यक आहे. सिरियातील परिस्थितीबाबत चिंता व्यक्त करतानाच कृष्णा यांनी अनावश्यक सैनिकीकरण रोखण्याची आवश्यकता प्रतिपादन केली.

Leave a Comment