विधानसभा उपाध्यक्षांची थापेबाजी उघड

मुंबई: आदर्श घोटाळ्यापासून दूर राहण्यासाठी संबंधितांची धावपळ सुरू असतानाच विधानसभा उपाध्यक्ष वसंत पुरके यांनी निवडणूक शपथपत्रात आदर्श सोसायटीत आपली सदनिका असल्याची थाप ठोकून दिल्याचे माहितीच्या अधिकारात मागितलेल्या माहितीवरून उघड झाले आहे.

यवतमाळ येथील सामाजिक कार्यकर्ते भीमराव राठोड यांनी माहितीच्या अधिकारात मागविलेली माहिती देताना अप्पर जिल्हाधिकार्यांनी आदर्श सोसायटीत पुरके यांना सदनिका वितरीत करण्यात आली नाही; असे स्पष्ट केले आहे.

पुरके यांनी आपले वार्षिक उत्पन्न केवळ अडीच हजार रुपये असल्याचे दाखवून मुख्यमंत्री कोट्यातून दोन सदनिका आपल्या पदरी पडून घेतल्या आहेत. याशिवाय त्यांच्या पत्नीच्या नावावरही एक सदनिका असल्याची माहिती या अर्जातून उघड झाली आहे.

या थापेबाजीमुळे पुरके यांना भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाच्या चौकशीला सामोरे जावे लागणार आहे.

Leave a Comment