टायगरला टाकणार जोकर मागे ?

गेल्या आठवड्यापासून ‘एक था टायगरची’ बॉक्स ऑफिसवरील जादू सध्या थोडी ओसरत चालली आहे. शुक्रवारी वेगवेगळ्या कथेवर आधारित असलेले चार सिनेमा एकाच दिवशी रिलीज होत आहेत. त्यामध्ये अक्षय कुमार व सोनाक्षी सिन्हाचा बहुचर्चित ‘जोकर’ हा सिनेमा हा याच आठवड्यात रिलीज होणार आहे. त्यामुळे आगामी काळात ‘जोकर’ हा सिनेमाची क्रेझ पाहता ‘टायगर’ला मागे टाकेल अशी अपेक्षा फिल्म मेकर्सकडून व्यक्त केली जात आहे.

या आठवड्यात ‘जोकर’ शिवाय कन्या भूण हत्येवर आधारित असलेली ‘जलपरी’ व ‘आई एम २४’ आणि ‘फ्रॉम सिडनी विद लव’ हे सिनेमे रिलीज होणार आहेत. त्यामुळे सर्वांचे लक्ष याकडे लागले आहे.

रीलीज होणाऱ्या या सर्व सिनेमाचा सध्याचा ट्रेड पहिला तर ‘जोकर’ सिनेमाला सर्वाधिक पसंती आहे. दिग्दर्शक व लेखक शिरीष कुंदर यांनी या सिनेमासाठी खूप मेहनत घेतली असून ही स्क्रिप्ट सर्वाना आवडेल अशीच आहे. हा प्रोजेक्ट अक्षय कुमारने स्वता तयार न करता शिरिष, फराह खान यांना सोबत घेऊन पूर्णत्वास नेला आहे. हा सिनेमा थ्रीडी तयार करण्याची आयडिया अक्षय कुमारचीच आहे. त्यामुळे आगामी काळात टायगरला शह देण्याची ताकत केवळ जोकर या सिनेमाताच आहे असे मत मार्केटिंग क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळीचे आहे.

Leave a Comment