धोनी कॅस्ट्रॉल क्रिकेटर ऑफ इंडिया २०११

बंगलोर: टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याला कॅस्ट्रॉल क्रिकेटर ऑफ २०११ हा पुरस्कार देण्यात आला. युवा विश्वचषक विजेता कर्णधार उन्मुक्त चंद याला सर्वोत्कृष्ट युवा क्रिकेटपटूचा तर टेस्ट क्रिकेटर ऑफ दि इयरचा पुरस्कार राहुल द्रविडला देण्यात आला.

कॅस्ट्रॉलच्या वतीने देण्यात येणार्‍या या पुरस्कारामध्ये वन डे क्रिकेटर ऑफ द इयरचा पुरस्कार सुरेश रैना याला प्रदान करण्यात आला. सातत्याने दर्जेदार गोलंदाजी करणार्‍या आर. अश्विन याला बोलर ऑफ दि इयरचा पुरस्कार देण्यात आला.

आयोजकांनी यावर्षीपासून नव्याने सुरू केलेले कॅस्ट्रॉल परफॉर्मन्स अंडर प्रेशर आणि कॅस्ट्रॉल स्टँड आउट परफॉर्मन्स अंडर प्रेशर हे पुरस्कार अनुक्रमे गौतम गंभीर आणि विराट कोहली यांना देण्यात आले.

सचिन तेंडुलकरने शतकांचे शतक केल्याबद्दल आणि वीरेंद्र सेहेवागने श्रीलंकेविरुद्ध झळकाविलेल्या द्विशतकाबद्दल त्यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. भारतीय कसोटी संघाचे माजी कर्णधार, प्रशिक्षक, व्यवस्थापक आणि निवड समितीचे माजी अध्यक्ष अजित वाडेकर यांना लाईफ टाईम अचिव्हमेंट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Leave a Comment