हे वाचून सर्वानाच थोडेसे आश्चर्य वाटले असेल तर काही जणाचा यावर अजूनही विश्वासही बसत नसेल, मात्र हे खरे आहे. ‘जय हो’ या गाण्यासाठी उत्कृष्ट साऊड डिझायनरचा ऑस्कर पुरस्कार विजेता ठरलेला रेसूल पुकटी गेल्या काही दिवसापासून दिग्दर्शनाच्या क्षेत्रात उतरला आहे. पाहिल्याच सिनेमासाठी त्याने महानायक अमिताभ बच्चनला साइन केले आहे. या सिनेमामध्ये ‘बिग बी’ पाकिस्तानी नागरिकाच्या रोलमध्ये दिसणार असल्याचे समजते.
अदयाप पर्यन्त या सिनेमाचे नाव फायनल झाले नाही. बिग बी नेहमीच वेगळ्या भूमिकेच्या शोधात असतात. त्यांना आवाहनात्मक भूमिका करायला आवडते. त्यामुळे ही वेगळी भूमिका कशाप्रकारे साकारतात याकडे फॅन्सचे लक्ष लागून राहिले आहे.
या सिनेमाला बिग बी ने होकार दर्शविल्याने रेसूल पेकुटी सध्या खूष आहे. रेसूल म्हणाला की, ‘ बिग बी ची भूमिका ही दुसऱ्या देशतील नागरिकाची असणार आहे. मात्र हा सिनेमा राजकीय पार्श्वभूमीवर आधारित नाही. हा सिनेमा मानविय कथेवर आधरित असा आहे. ज्यामध्ये अमिताभचा रोल हा भारत व पाक दोन्ही देशातील नागरिकाच्या मनाला स्पर्श करणारा आहे. एका न्यूज चॅनेलचा रिपोर्ट बघितल्यानंतर त्याला ही कथा सुचली होती.’