कसाबचा हिसाब पुरा ,फाशीवर शिक्कामोर्तब

नवी दिल्ली दि२९ – मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील एकमेव जिवंत अतिरेकी मोहम्मद अजमल अमीर कसाब याची फाशी सर्वोच्च न्यायालयाने कायम केली आहे. देशविरोधात युद्ध पुकारल्याचा आरोप मान्य करून न्यायाधीश आफताब आलम आणि न्यायाधीश सी.के.प्रसाद यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला आणि तमाम भारतीयांची इच्छा पूर्ण केली.

दहशतवाद विरोधी न्यायालयाने दिलेल्या फाशीवर मुंबई हायकोर्टाने शिक्कामोर्तब केल्यानंतर या फाशीच्या शिक्षेला कसाबने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते. आपले वय लक्षात घेऊन फाशी देऊ नये अशी कसाबची मागणी होती. मुंबईवर अन्य नऊ अतिरेक्यांसह कराची येथून समुद्र मार्गे आलेलं कसाबने केलेल्या हल्ल्यात १६६ जणांना जीव गमवावा लागला होता. अन्य नऊ अतिरेकी पोलीस चकमकीत ठार झाले होते व कसाब एकटाच जिवंत सापडला होता.

अनेक निरपराध लोकांचे बळी घेतलेत त्या कसाबवर आता पर्यंत तब्बल २६ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. एकाद्या व्हीव्हीआयपीलाही लाजवेल एवढा खर्च कसाबच्या सुरक्षेवर करण्यात आला आहे. आणि माहिती खुद्द गृहमंत्र्यांनीच दिली आहे.
जेवण : ३४ हजार ९७५ रुपये
औषध : २८ हजार ६६ रुपये
बराकीचे बांधकाम : ५ कोटी २५ लाख रुपये
पोलिसांचे वेतन : १ कोटी २२ लाख रुपये
इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीसः १९ कोटी २८ लाख रुपये
एकूण खर्च : २५ कोटी ७५ लाख १ हजार ४१ रुपये

महाराष्ट्र सरकारने हा खर्च केला आहे.

सध्या कसाबला मुंबईतील आर्थररोड तुरुंगात ठेवण्यात आले आहे. त्याच्यासाठी तुरुंगात स्वतंत्र बराकीचे बांधकाम करण्यात आले आहे. कसाबच्या सुरक्षेसाठी पोलिसांबरोबरच इंडो-तिबेटियन बॉर्डरचे जवान तैनात करण्यात आले आहेत. २६-११ च्या मुंबई हल्ल्यातील कसाब हा मुख्य आरोपी असून त्याच्या सुरक्षितते बाबतीत विशेष काळजी घेतली जात आहे. आर्थर रोड तुरुंगात कसाबला दिल्या जाणार्‍या जेवणाविषयी शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी बुधवारी खळबळजनक गौप्यस्फोट केला होता. त्यावर गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी इतर कैद्यांना दिले जाणारे जेवण कसाबला दिले जात असल्याचे सांगितले होते..

आर्थररोड तुरुंगात कसाबसाठी एक खास सेल तयार करण्यात आले आहे. कसाबच्या सुरक्षेला कोणताही धोका पोहचू नये हा त्या मागचा उद्देश आहे. कारण कसाबमुळे पाकिस्तानच्या नापाक इराद्या सबळ पुरावाच भारताच्या हाती लागला. त्यामुळेच कसाबच्या सुरक्षेवर मोठा खर्च करण्यात आला.

मुंबईवर हल्ला करण्यासाठी कसाब आणि त्याचे साथिदार पाकिस्तानातून समुद्र मार्गे मुंबईत दाखल झाले आणि त्यानंतर त्यांनी मुंबईत अक्षरशः दहशत निर्माण केली….या हल्ल्यामागं पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयचा हात असल्याचे तपासात उघड झाले आहे..कसाबच्या अटकेमुळं पाकिस्तानचा तो नापाक डाव जगासमोर आला आहे. त्यामुळंच सुरुवातीपासूनच कसाबच्या सुरक्षीततेसाठी राज्य सरकारकडून विशेष काळजी घेतली जात होती.

कसाबला सेलमध्येच टॉयलेट बाथरुमची व्यवस्था करण्यात आली असून त्याच्या बराकीवर हायसेंसिटीव्ह क्लोज सर्कीट कॅमेर्‍यातून चोवीसतास नजर ठेवली जाते. त्या कॅमेर्‍यांच्या माध्यमातून कसाबच्या हलचालीवर लक्ष ठेवले जात असल्याचे बोलले जाते. इतक्या कडक सुरक्षा व्यवस्थेत अजमल कसाबला ठेवण्यात आले असून त्यावर होणार्‍या खर्चाचा भूर्दंड सरकारला आणि पर्यंयाने जनतेला सोसावा लागतो. कसाबच्या फाशी विषयी जनतेच्या भावना तीव्र होत्या. तरी न्यायालयीन प्रक्रियेला छेद न देता या प्रक्रियेला वेळेची मर्यादा असायला हवी असा सूर आता उमटू लागला होता.

Leave a Comment