आईपण मिरवणारी ऐश्वर्या रॉय इंडस्ट्रीमध्ये परतणार की नाही आणि परतली तर कधी या चर्चेने चांगलाच जोर धरला आहे.मात्र सध्या ऐश्वर्याने पती अभिषेक सोबतच काम करण्याचा संकल्प केलेला दिसतोय. कारण प्रोड्युसरला ती पती अभिषेक बच्चन सोबतच काम करणार अशी अट घालत आहे. तिच्या या अटी निर्माते मान्य करण्याच्या मूड मध्ये नाहीत. तिच्या या नखऱ्यामुळे बऱ्याच चांगल्या ऑफर तिच्या हातून चालल्या आहेत.
आराध्याला जन्म दिल्यानंतर ऐश्वर्या रॉय पुन्हा लाइमलाइटमध्ये परतली आहे. ऐशने नुकतेच एका ज्वेलरी ब्रांडच्या अॅडसाठी फोटो शूट केला आहे. ऐशने वजन कमी केल्याने ती अधिक सुंदर दिसत आहे. आणि तिच्याकडे काही ऑफरही येत आहेत.
काही दिवसापूर्वीच एक निर्माते ऐश्वर्याकडे एका बिग बॅनरचा सिनेमा घेऊन आले होते. सगळे काही फायनल झाले होते. सिनेमा साइन करण्यापूर्वी तिने अभिषेक बच्चनला काम मिळणार असेल तरच ती सिनेमात काम करणार अशी अट घातली. परिणाम इतकाच झाला की तिचा हा रोल नंतर कैटरीनाकडे गेला. ऐश्वर्याची दुसरी इनिंग सुरू होण्यापूर्वीच संपणार काय याचा अंदाज लवकरच येईल.