रणबीर कपूरला बसला दंडाचा फटका

सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान केल्याची शिक्षा रणबीर कपूरलाही भोगावी लागली आहे. या प्रकरणी त्याला उदयपूर न्यायालयाने २०० रुपये दंड भरण्याचे आदेश दिले आहेत.

२८ मे २०१२ रोजी धर्मा प्रोडक्शनच्या ये जवानी है दिवानी या सिनेमाच्या शुटसाठी तो काही काळासाठी उदयपूर परिसरात आला होता. येथील प्रसिद्ध असलेल्या झील किनाऱ्यावर व गणगौर घाटात फिरत असताना रणबीरने धूम्रपान केले होते. त्याची ही कृती पाहून अन्य काही पर्यटकांनी त्याला या ठिकाणी धूम्रपान करण्यास मनाई असल्याची कल्पना दिली. मात्र त्या सूचनेकडे रणबीरने दुर्लक्ष केले होते.

परिणाम असा झाला की उदयपूर येथील रहिवाशी हरीश वैष्णव याने रणबीर विरुद्ध सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करून अवमान केल्याची याचिका उदयपूर येथील न्यायालयात दाखल केली होती. न्यायालयाने धुम्रपान अधिनियम २०१० नुसार रणबीर कपूरला २०० रुपये दंड भरण्याचे आदेश दिले आहेत. यापूर्वी रणबीर कपूर शिवाय इंडस्ट्रीमधील अनेक कलाकराना या नियमाचा फटका बसला आहे. तरी ही त्यांच्या वागण्यात मात्र आतापर्यंत तरी फारसा फरक पडलेला नाही.

Leave a Comment