नवी दिल्ली,२८ ऑगस्ट-सॅमसंगविरोधात खटला जिंकल्यानंतर अॅपल आणखी एक सुखद धक्का देण्याच्या तयारीत आहे. जगभरात लोकप्रिय ठरलेला अॅपलचा आयपॅड’चा नवा अवतार लवकरच लॉन्च करण्यात येणार आहे. ’ऑल थिंग डिजिटल’ या इंग्रजी वेबसाइटनुसार, येत्या सप्टेंबरमध्ये अॅपलचा ’आयफोन-५’ लॉन्च होणार आहे. ’आयफोन-५’ बाजारात आल्यानंतर लगेच एका महिन्यात अपलचा ’आयपॅड मिनी’ लॉन्च होणार असल्याची चर्चा आहे.
अॅपलच्या सूत्रांनुसार, येत्या १२ सप्टेंबर रोजी ’आयफोन-५’ बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. त्यानंतर लगेचच ऑक्टोबरमध्ये अत्याधुनिक ’आयपॅड मिनी’ही बाजारात आणण्याची अॅपलचा मानस आहे. या नव्या आयपॅडची स्क्रीन सात इंचाची असेल. अॅपलचा हा आयपॅड लॉन्च होण्यापूर्वी लोकप्रिय ठरला आहे. परंतु अमेजन किंडल, गूगल नेक्सस आणि सॅमसंग कंपनीचे बाजारात येणारे नवे प्रोडक्स अपलच्या आयपॅडशी स्पर्धा करत आहेत, हे नाकारता येणार नाही.