नृत्य हेही करिअर आहे

danceप्रत्येकाला नाचायला आवडते. परंतु सर्वांनाच नाचता येत नाही. काही थोड्याच लोकांना चांगले नाचता येत असते आणि ज्यांना नाचता येते त्यांना नृत्य हे एक करिअर आहे याची जाणीव नसते. त्यामुळे ज्यांच्या अंगात नृत्यकला असते त्यातले बहुसंख्य लोक नृत्याकडे केवळ छंद म्हणून पाहतात. परंतु नृत्य हे करिअर आहेच पण ते व्यवसाय म्हणून सुद्धा उत्तम करता येते आणि त्यामुळेच काही संस्थांनी नृत्याचे शिक्षण देणारे पदवी अभ्यासक्रम सुरू केलेले आहेत.

बंगळूरच्या अत्ताक्कलरी सेंटर फॉर मूव्हमेंट आर्टस् या संस्थेने नृत्याशी संबंधित असलेला पदविका अभ्यास क्रम सुरू केलेला आहे. हा अभ्यासक्रम एक वर्षाचा आहे आणि त्यामध्ये केवळ नृत्यच नव्हे तर नृत्याशी संबंधित अशा सर्व कला आणि व्यायाम यांचे शिक्षण दिले जाते. या अभ्यासक्रमात शरीराचा तोल सांभाळणे, शरीराची लवचिकता आणि विविध प्रकारच्या हालचाली कौशल्याने करणे या विषयांचा अभ्यास घेतला जातो. त्यामध्ये योगाचा समावेश असतो.

भरतनाट्यम्, बॅले अशा विविध नृत्यांचा तर अभ्यास केला जातोच पण कोरिओग्राफी म्हणजे काय आणि त्याचे तंत्र कोणते याचेही प्रशिक्षण दिले जाते. नृत्य कलेचा इतिहास आणि तत्वज्ञान यांचाही अभ्यासक्रमात समावेश असतो. हा अभ्यासक्रम पूर्ण करणार्‍यांना भरपूर रोजगार संधी आहेत. चित्रपटात, नाटकात, ऑकर्ेस्ट*ामध्ये आणि दूरदर्शनवरील मालिकांमध्ये काम करणारे अभिनेते आणि अभिनेत्री यांना अनेक वेळा नाचावे लागते त्यांना नृत्याचे शिक्षण देणारा शिक्षक म्हणून हा अभ्यासक्रम पूर्ण करणारा पदविकाधारक काम करू शकतो.

या उमेदवारामध्ये अभिनय कौशल्य असेल तर तो अभिनेता म्हणूनही स्वतः काम करू शकतो. याशिवाय अनेक लोक केवळ छंद म्हणून स्वतः नृत्य शिकतात किवा आपल्या मुला-मुलींना नृत्य शिकवतात. त्यांना शिकविण्यासाठी हा पदविकाधारक स्वतः नृत्याचे क्लासेस काढून चांगले पैसे कमावू शकतो. अनेक वेळा या नृत्य शिक्षकांना देशात अनेक ठिकाणी जाण्याची संधी मिळते आणि काही वेळा परदेशी वारीची सुद्धा संधी मिळते.

अशा प्रकारचे पदविकाधारक नृत्य शिबिरे किवा नृत्याच्या कार्यशाळा घेऊन सुद्धा उत्तम कमाई करू शकतात. मात्र अशा प्रकारचा व्यवसाय करण्याची इच्छा नसेल तर हे उमेदवार नृत्याचे प्रगत शिक्षण सुद्धा घेऊ शकतात. या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी इच्छुक उमेदवार कोणत्याही विद्या शाखेची बारावीची परीक्षा उत्तीर्ण झालेला असला पाहिजे. या अभ्यासक्रमाचे शैक्षणिक वर्ष १० सप्टेंबरला सुरू होते. अधिक माहितीसाठी संफ – फोन नं. ०८०२२१२३६८४/४१४८३५३४.

Leave a Comment