प्रिन्स हॅरीला पोर्नफिल्मसाठी ऑफर

लंडन दि.२७ – ब्रिटनच्या राजघराण्यातील राजकुमार हॅरी याला पोर्न फिल्ममध्ये काम करण्यासाठी १० दशलक्ष डॉलर्सची ऑफर देण्यात आली आहे.  गेल्या आठवड्यात लास वेगास येथे नग्नावस्थेतील प्रिन्स हॅरीचे फोटो प्रसिद्ध झाल्यानंतर उडालेल्या गोंधळात या ऑफरमुळे अधिकच भर पडली आहे. व्हिव्हिड एन्टरटेनमेंटच्या स्टीव्ह हिशर्च याने हॅरीला ही ऑफर देणारे पत्रच लिहिले असून आगामी द ट्रबल वुईथ हॅरी या पोर्नफिल्ममध्ये काम करण्यासाठी १० दशलक्ष डॉलर्स देण्याची तयारी दाखविली आहे. लंडन रॉयल पॅलेसच्या पत्त्यावर हे पत्र पाठविले गेले आहे.

मौजमजेत रमलेल्या २७ वर्षीय हॅरीची नग्न छायाचित्रे इंटरनेटवर जगभर झळकल्यानंतर त्याने अशी आणखी छायाचित्रे येऊ नयेत म्हणून आपले फेसबुक अकौंट बंदच करून टाकले आहे. मात्र या छायाचित्रांवरून त्याला राजघराण्याकडून चांगल्याच कानपिचक्या मिळाल्या आहेत. वडील प्रिन्स चार्लस आणि राणीने रॉयल फॅमिलीची प्रतिमा जगभर मलिन केल्याबद्दल हॅरीला सार्वजनिक माफी मागण्याची सूचना दिली असून त्याने जबाबदारीने वागले पाहिजे अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे.

२९ ऑगस्टला सुरू होत असलेल्या लंडन पॅराप्लेजिक ऑलिंपिक गेम्सपूर्वी हॅरी माफीनामा सादर करणार आहे असे समजते.

Leave a Comment