तालिबानांनी केले १३ जणांचे शिरकाण

काबुल: अफगाण सेना आणि नाटोच्या सुरक्षा दलांनी तालिबान अतिरेक्यांच्या विरोधात कडक घोरण स्वीकारल्यानंतरही तालिबानी कारवायांना आळा बसलेला नाही. रविवारी रात्री गाण्या- बजावण्यात मग्न असलेल्या ११ पुरुष आणि २ महिलांचा तालिबानी दहशतवाद्यांनी शिरच्छेद केला. त्यांचे मृतदेह एका खेड्यातील गावातून हस्तगत करण्यात आले आहेत.

तालिबान दहशतवाद्यांना आळा घालण्यासाठी अफगाण आणि नाटो सेनादलांनी मागील काही काळापासून कडक पावले उचलली आहेत. मात्र तालिबान दहशतवाद्यांनीही अधिक आक्रमक रूप धारण केले आहे.

दक्षिण अफगाणिस्तानच्या एका प्रांतात एक पार्टी सुरू असताना गाण्या बजावण्यात रमलेल्या १३ जणांना अफगाण दहशतद्यांनी यमसदनाला पाठविले. हेमलंद प्रांतातील जमिन्दावर गावातील एका घरात त्यांचे मृतदेह सापडले.

Leave a Comment