आदर्श घोटाळ्यातून नाव वगळावे: चव्हाण

मुंबई: केंद्रीय अन्वेषण विभागाने आदर्श प्रकरणी प्रथम माहिती अहवालात आपले नाव चुकीच्या पद्धतीने गोवले असल्याचा आरोप करीत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी या खटल्यातून आपले नाव वगळावे; अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात सादर केली. सीबीआय आपली चौकशी करू शकते का; असा सवालही त्यांनी केला आहे.

आदर्श सोसायटी घोटाळया प्रकरणी सीबीआयने चव्हाण यांच्यासह १२ जणांवर आरोपपत्र दाखल केले आहे. चव्हाण यांनी महसूलमंत्री असताना आदर्श सोसायटीला ४० टक्के सामान्य सभासद घेण्याची अनुमती दिली. त्याबदल्यात त्यांना कुटुंबियांच्या नावाने ३ सदनिका मिळाल्या असा सीबीआयचा आरोप आहे.

सीबीआयने चव्हाणांवर भ्रष्टाचार आणि फसवणुकीचे गुन्हे दाखल केले आहेत. सीबीआयला आपली चौकशी करण्याचा अधिकार आहे काय; असा चव्हाण यांचा सवाल आहे. आपले नाव चुकीच्या पद्धतीने घेतल्यामुळे ते आरोपपत्र रद्द करावे आणि आपल्यावर कारवाई करण्यास सीबीआयला मज्जाव करावा; अशी चव्हाण यांची मागणी आहे.

Leave a Comment