
नवी दिल्ली: अरविंद केजरीवाल यांच्यासह टीम अण्णाच्या ज्येष्ठ सदस्यांवर संसद मार्ग पोलीस ठाण्यात दंगल भडकविण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवी दिल्ली: अरविंद केजरीवाल यांच्यासह टीम अण्णाच्या ज्येष्ठ सदस्यांवर संसद मार्ग पोलीस ठाण्यात दंगल भडकविण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोळसा खाण घोटाळा आणि भ्रष्टाचाराच्या निषेध करण्यासाठी इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या वतीने आयोजित आंदोलनात रविवारी कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यात राजधानी दिल्लीच्या महत्वाच्या ठिकाणी झटापट झाली. या प्रकारात १५ पोलीस आणि ६ कार्यकर्ते जखमी झाले.
पोलिसांनी कार्यकर्त्यांना काबूत आणण्यासाठी लाठीमार, अश्रुधूर आणि पाण्याच्या फवार्याचा वापर केला. पोलिसांनी घेरावला बंदी घालून केवळ जंतर मंतर येथे आंदोलनाला परवानगी दिली असतानाही कार्यकर्त्यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष नितीन गडकरी अशा नेत्यांच्या निवासस्थानी घेराव घालण्याचा प्रयत्न केल्याने ही झटापट झाली.
या प्रकरणी केजरीवाल यांच्यासह प्रशांत भूषण, मनीष सिसोदिया, गोपाल राय, नीरज कुमार यांच्यावर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.