तो दारुच्या नशेत रणबीरला शिकवायचा डान्स

युटीव्ही बॅनरखाली तयार झालेल्या ’बर्फी’ चित्रपटात रणबीर कपूरला एका दारुड्याने डान्स शिकवला, यावर तुमचा विश्वास बसेल का? नाही ना.. अहो पण हे खरे आहे.
झाले असे की, या चित्रपटात रणबीरने मुकबधिर तरुणाची व्यक्तिरेखा साकारली आहे. या चित्रपटात रणबीरला वेगळ्या प्रकारचे नृत्य करायचे होते.

तसे पाहता रणबीर एक चांगला डान्सर आहे. मात्र चित्रपटाच्या मागणीनुसार एका हटके डान्सची गरज होती. मग यावर चित्रपटाचे दिग्दर्शक अनुराग बासूने एक हटके कल्पना शोधून काढली. त्यांनी सेटवर अशा एका व्यक्तिला शोधून काढले जो दारु पिल्यानंतर वेगवेगळ्या मुद्रेत डान्स करतो.

हा व्यक्ति दारु पिऊन डान्स करायचा आणि रणबीर त्याला फॉलो करायचा, अशाप्रकारे ’बर्फी’ चित्रपटात रणबीरच्या डान्सची कोरिओग्राफी करण्यात आली.

Leave a Comment