हरियाणाच्या ऑलिम्पिक विजेत्यांना मिळणार ऑडी कार

नवी दिल्ली: ऑलिम्पिक पदक जिंकून देशाची मान उंचावणार्या हरियाणाच्या खेळाडूना ऑडी क्यू-५ ही आलिशान कार देऊन त्यांचा गौरव करण्यात येणार आहे.

मल्ल सुशील कुमार, योगेश्वर दत्त, नेमबाज गगन नारंग आणि बॅडमिंटन खेळाडू सायना नेहवाल यांना सोमवारी होणार्या सत्कार समारंभात हरियाणा सरकार आणि डीएलएफ रिएल्टी यांच्या वतीने ऑडी क्यू-५ ही कार देण्यात येणार आहे. राज्यातील ज्या खेळाडूंनी ऑलिम्पिकपर्यंत मजल मारली; पण पदक मिळू शकले नाही; अशा खेळाडूंनाही मारुती सेदान एसएक्स-४ ही कार प्रोत्साहनपर देण्यात येणार आहे.

डीएलएफ रिएल्टी कंपनी इंडियन प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धेची मुख्य प्रायोजक कंपनी होती. कंपनीने क्रिकेटबरोबरच अन्य खेळांना प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे.

Leave a Comment