प्रौढांसाठीचे सिनेमे दूरचित्रवाणीवरून हद्दपार

नवी दिल्ली: डर्टी पिक्चर आणि जन्नत-२ हे चित्रपट दूरचित्रवाणीवरून प्रक्षेपित करावे अथवा नाही; याबाबत मोठे वादंग झाडल्यावर प्रौढांसाठी ए प्रमाणपत्र असलेले कोणतेही चित्रपट दूरचित्रवाणीवरून प्रसारित न करण्याचा निर्णय सेन्सॉर बोर्डाने घेतला आहे. मात्र दूरचित्रवाणी प्रसारणाचे हक्क कोट्यावधी रुपयांना आधीच विकून बसलेल्या प्रॉडक्शन हाऊसचे त्यामुळे धाबे दणाणले आहेत.

यापूर्वी ए प्रमाणपत्रप्राप्त चित्रपट दूरचित्रवाणीवरून प्रसारित करण्यापूर्वी त्यांना पुन्हा सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र घ्यावे लागत असे. त्यावेळी बोर्डाने सुचविलेले संवाद अथवा दृश्यांना कात्री लावणे अनिवार्य होते. त्यामुळे आमीर खानचा देल्ही बेल्ली, अनुराग कश्यप याचा गँग्ज ऑफ वासेपूर, विक्रम भट्ट याचा हेट स्टोरी असे अनेक मोठ्या बॅनरचे चित्रपट दूरचित्रवाणी प्रदर्शन प्रमाणपत्र मिळविण्यासाठी रांगेत आहेत.

मात्र सिनेमॅटोग्राफ कायद्याचा (१९५२) आधार घेऊन सेन्सॉर बोर्डाने हे प्रमाणपत्र देणेच बंद केल्याने ते अडचणीत आले आहेत.

Leave a Comment