शिल्पा करणार माधुरीची कॉपी

लाखो ह्रदयाची धडकन असलेली माधुरी दीक्षितने पती श्रीराम नेनेला सोबत घेऊन प्रोडक्शन हाऊस सुरु करण्याचा निर्णय घेऊन काही दिवस उलटले आहेत. तेच आता तिच्या पावलावर पाऊल ठेवत शिल्पा शेट्टीने ही पती राज कुंद्राला सोबत घेत प्रोडक्शन हाऊस सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. शिल्पाने तिच्या प्रोडक्शन होउसच्या माध्यमातून ‘ढीशक्याउं’ या सिनेमाची घोषणा ही नुकतीच केली आहे. हा सिनेमाची निर्माती राज कुंद्रा हा स्वतः करणार आहे. या सिनेमात संजय दत्तचा प्रमुख रोल असल्याचे समजते.

त्यासोबतच राजने या सिनेमासाठी जॉन अब्राहम, विद्यत जमवल यांना देखील साइन केले आहे. हा सिनेमा मिक्सड मार्शल आर्टवर आधारित आहे. त्यामुळे या सिनेमात मारामारीचे सीन अधिक असणार आहेत. शिल्पाच्या या सिनेमाचे शूट जानेवारी २०१३ पासून सुरु होणार आहे. हा सिनेमा पुढील वर्षाच्या शेवटी रिलीज होणार असल्याचे समजते. या सिनेमाशिवाय कुंद्रा यांचे लक्ष छोट्या पडद्यावर असून प्रोडक्शन हाउसच्या मध्यमातून मालिका निर्मिती करण्याचा त्यांचा प्रयत्न राहणार आहे. या मालिका हॉलीवूड वॉरीयर्सवर आधारित असणार आहेत.

राज कुंद्रा यांचा हा सर्व काही हॉलीवूड मसाला प्रेक्षकांना आवडणार की नाही यासाठी त्यांना पुढील वर्षाची वाट पहावी लागणार आहे.