पुजाराची दमदार खेळी; भारत सुस्थितीत

न्यूझीलंड विरुद्ध हैदराबाद येथे खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात चेतेश्वर पुजाराच्या दमदार दीड शतकाच्या मदतीने भारताचा संघ सुस्थितीत पोहचला आहे. दुसऱ्या दिवशी उपहारापर्यंत भारताने पाच गडी बाद ३७४ धावा केल्या होत्या.

भारतीय संघाची सुरुवात सेहवाग आणि गंभीरने दमदार केली होती. पण त्यानंतर गंभीर, सेहवाग व सचिन तेंडुलकर पाठोपाठ बाद झाल्याने तीन बाद १२५ अशी अवस्था झाल्याने भारताचा संघ थोडासा अडचणीत सापडला होता. मात्र पुजारा व विराट कोहलीने दमदार फलंदाजी करीत भारताचा डाव सावरला. विराटने पुन्हा एकदा दमदार खेळी करीत ५८ धावा केल्या. कोहलीनतर रैना लगेचच बाद झाल्याने भारताची अवस्था ५ बाद २७० अशी झाली होती. त्यानंतर पुजारला कर्णधार धोनीने खंबीर साथ दिली. त्यामुळे पहिल्या दिवसाअखेर भारताने पाच गडी बाद ३०७ धावा केल्या होत्या. पुजाराने दमदार खेळी करताना तो ११९ धावावर नाबाद रहिला.

दुसऱ्या दिवसाची सुरुवात दोघांनी मिळून संथ गतीने केली. दुसऱ्या दिवशी उपहारापर्यंत भारताने पाच गडी बाद ३७१ धावा केल्या होत्या. चेतेश्वर पुजाराने नाबाद १५० धावा केल्या होत्या तर कर्णधार धोनी नाबाद ६० धावावर खेळत होता.

Leave a Comment