अमीर खान पाहतोय कैटरीनाची वाट

एक था टायगर हिट झाल्यापासून कैटरीनाचा भाव चांगलाच वधारला आहे. सध्या ती एकाचवेळी तीन खान सोबत काम करीत असल्यने तिचे शेडूल सुद्धा खुपच बीझी आहे. सध्या ती शाहरुख खान सोबत लडाखमध्ये शूट करण्याच्या कामात व्यस्त आहे. तिकडे शिकागोमध्ये अमीर खान शूटसाठी गेल्या काही दिवसापासून कैटरीनाची वाट पाहत बसला आहे.

‘एक था टायगर’च्या प्रमोशनसाठी पहिल्यांदा सलमान खानने तिला लडाखमध्ये जाण्यापासून थांबवून घेतले. त्यानंतर शाहरुखने यश चोप्रामार्फत तिची मनधरणी केल्यानंतर आता ती लडाखला पोचली आहे. तेथील शूट संपवून ती आठ ते दहा दिवसात शिकागोला पोहचणार होती. मात्र सध्या शाहरुख खानने विचार बदल्यामुळे तिचा लडाखमधील मुक्काम आणखीन काही दिवस तरी वाढणार असे दिसत आहे.

आमिरला काही स्टंट सीनची प्रॅकटीस तिच्या सोबत करायची होती, मात्र काही दिवस अमीर खान सत्यमेव जयते या त्याच्या टीवी शो मध्ये बीझी होता. त्यानंतर कैटरीना ‘एक था टायगर’च्या प्रेमोमध्ये व्यस्त होती. सध्या टायगरने कैटला फ्री केले आहे. मात्र आता शाहरुख ज्यावेळी तिला सोडेल त्यावेळीच ती शिकागोला जाऊन आमिरला जॉइन करणार आहे.

Leave a Comment