पद्मिनी कोल्हापूरे करणार पुनरागमन

दिवंगत अभिनेते राज कपूर यांच्या ‘प्रेम रोग’ या सिनेमाद्वारे लाखो फॅन्सना अभिनयाच्या जोरावर भूरळ घालणारी अभिनेत्री पद्मिनी कोल्हापूरे पुन्हा बॉलीवूडमध्ये पुनरागमन करीत आहे. काही दिवसापूर्वीच तिला दिग्दर्शक राजकुमार संतोषीने ‘फटा पोस्टर निकला हिरो’ या सिनेमासाठी साईन केले आहे. या सिनेमामध्ये ती शाहीद कपूरच्या आईचा रोल करणार आहे.

हा सिनेमा आई व मुलगा यांच्यातील गंभीर नात्यावर आधरित आहे. या सिनेमातील रोलसाठी सुरुवातीला संतोषीने पद्मिनी कोल्हापुरे हिच्याशी संपर्क साधला असता तिने नकार दर्शविला होता. शाहीद आणि पद्मिनीच्या वयातील अंतर १५ वर्षाचे असल्याने तिने नकार दर्शविला होता, मात्र ज्यावेळी तिला संतोषीने या सिनेमातील तिच्या भूमिकेबाबत समजावून सांगितले त्यानंतर तिने होकार दर्शविला आहे.

या सिनेमामध्ये शाहीद सोबत नायिका म्हणून एलीयाना डिक्रुझ ही काम करणार आहे. याबाबत बोलताना संतोषी म्हणाला, ‘ या रोल साठी मला पद्मिणी एकदम परफेक्ट वाटली. त्यामुळे मी तिची निवड केली. यापूर्वी मी माधुरी दीक्षित, रेखा यांच्या सोबत काम केले आहे. मात्र पद्मिनी सोबत काम करण्यची संधी मला कधी लाभली नाही. त्यामुळेच या सिनेमातील सिरीयस रोलसाठी पद्मिनी ही परफेक्ट वाटते.’
.

Leave a Comment