शाहरुख-कैटरीनाने निवडले रोमांससाठी लद्दाख

टायगरच्या फॅन्ससाठी ही बातमी आवडणार नाही, पण आगामी काळात कैटरीना बॉलीवूडच्या किंग खान सोबत लद्दाख आणि पहलगाव येथील नयनरम्य वातावरणात चालली आहे. आगामी काळात यशराज बॅनरच्या सिनेमाचे शूट याठिकाणी होणार असून यामध्ये शाहरुख-कैटरीनाने प्रमुख रोल साकारला आहे.

या ठिकाणी किंग खान हा रविवारी पोहचणार आहे. त्याची पॉप्युलराटी पाहता यशराज बॅनरकडून त्यच्या सुरक्षा व्यवस्थेची संपूर्ण काळजी घेण्यात आली आहे. जम्मू काश्मीरमधील सुरक्षा जवान त्याशिवाय पोलीस आणि सीआरपीएफच्या जवानांना ही सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहे.

यापूर्वी १९९८ साली शाहरुखच्या दिल से या सिनेमाचे शूट लद्दाखमध्ये झाले होते. याठिकाणी शाहरुख शूटसाठी तीन दिवस थांबणार आहे. त्याच्या सोबत याठिकाणी शूट साठी कैटरीना तीन दिवस थांबणार आहे. सलमान खानेने ‘एक था टायगर’च्या प्रमोशनसाठी कैटरीनाला थांबवून घेतले होते. त्यामुळे काही दिवसासाठी या सिनेमाचे शूट रखडले होते. शूटच्या माध्यमातून शाहरुख-कैटरीना ही जोडी एकत्रित येणार आहे. यशराजचा हा बहुचर्चित सिनेमा यावर्षी दिवाळीमध्ये रिलीज होणार आहे.

Leave a Comment