वॉशिंग्टन: मंगळाच्या पृष्ठभागाचा अभ्यास करण्यासाठी पाठविण्यात आलेल्या क्युरिऑसिटी या अंतराळयानाने आपले काम नुकतेच सुरू केले असताना मंगळावरील भूकंपाचा अभ्यास करण्यासाठी नासाने इनसाईट मिशन हाती घेतले आहे.

मंगळावर कशा प्रकारचे भूकंप होतात ; ते किती क्षमतेचे असतात; मंगळाच्या भूगर्भात भेगा आहेत का अशा प्रकारची माहिती इनसाईट मिशन अंतर्गत जमा केली जाणार असल्याचे नासाचे वरिष्ठ अधिकारी जॉन ग्रुन्स्फ़ील्ड यांनी सांगितले. मंगळाच्या भूगर्भाबाबत अद्याप कोणतीही माहिती उपलब्ध नाही. सेस्मॉलॉजीच्या तत्वांचा वापर करून ही माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
त्याचप्रमाणे मार्च २०१६ मध्ये मंगळावर यंत्रमानव पाठवून मंगळावरील भूगर्भाची रचना, त्यातील हालचाली, अंतर्गत प्रवाह, तापमान याची माहिती घेतली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.