अमेरिकन सैन्यदलाच्या हवाई तळावर हल्ला

काबूल: अमेरिकन हवाई दलाच्या तळावर मंगळवारी तालिबान दहशतवाद्यांनी रॉकेट हल्ला चढविला. अफगाणीस्तानातील अमेरिकन सैन्य दलाचे प्रमुख मार्टिन डिम्पसी हेच दहशतवाद्यांचे लक्ष्य होते. मात्र ते दूर असल्याने या हल्ल्यातून बचावले.

या हल्ल्यात एका विमानाचे किरकोळ नुकसान झाले असून विमानांची देखभाल करणारे दोन अभियंते जखमी झाले आहेत.

मागच्याच आठवड्यात अमेरिकन लष्कराचे हेलिकोप्टर पाडल्याचा दावा तालिबान दहशतवाद्यांनी केला होता. मागील काही काळापासून सुरक्षा दलाच्या गणवेशात दहशतवादी हल्ले करीत आहेत. अशा हल्ल्यांमध्ये अमेरिकी सैन्याची मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली आहे.