नैराश्य व तणावाने मेंदु अंकुचणाचा धोका

stress2

वॉशिंग्टन,दि. १४ – एका नवीन अमेरिकन अध्ययनात सांगण्यात आले की, तणाव व नैराश्याने मेंदु अकंचु शकते. यामुळे तुम्ही भावनात्मक व मानसिक रूपाने कमकुवत होऊ शकतात. तणाव व नैराश्याला कमी लेखण्याची चुक कदापी करू नये. 

येल युनिवर्सिटीच्या संशोधकांनी नैराश्य व तणावाने मेंदु अंकुचण्याचे कारण शोधण्याचा दावा केला आहे. संशोधकांनी मेंदुत एक जेनेटिक स्विच शोधले आहे. हे स्विच मानवी मेंदूतील संपर्क कमकुवत करते आणि प्राण्यांमध्ये याने नैराश्याची स्थिती बनते. 

नेचर मेडिसीनमध्ये प्रकाशित वृत्तानुसार हे जेनेटिक स्विच प्रतिलेखन (ट्रांसक्रिप्शन) कारक म्हणून ओळखले जाते. हे अनेक महत्वपूर्ण जीनच्या प्रभावाला दाबून ठेवते. हे जीन मेंदुच्या पेशीदरम्यान संपर्क स्थापित करण्यासाठी आवश्यक आहे. अशात या जीनच्या प्रभावात कमतरता आल्यामुळे मेंदु संकुचित होतो.

प्रमुख संशोधक मनोविज्ञान, न्यूरोबायोलॉजी व फार्माकोलॉजीचे प्रा. रोनाल्ड ड्यूमन म्हणाले की, या अध्ययनाद्वारे आम्ही जाणू इच्छितो की, तणावाने मानवात मेंदु पेशीमधील संपर्क कमकुवत होते. जेव्हा एकेरी प्रतिलेखन कारक सक्रिय होते, तेव्हा भावना प्रकट करण्यात उपयोगी येणार्या मेंदुचे सर्किट्स व अनुभूतीत समस्या निर्माण होते.

संशोधकांनी एक मेंदु बँकेने घेतलेले नैराश्ययुक्त व नैराश्यमुक्त रूग्णाच्या मेंदु लहरीचे अध्ययन केले. त्यांना या लहरीत जीनच्या सक्रियतेचे वेगवेगळे स्तर दिसले. नैराश्य असणार्या रूग्णाच्या मेंदु लहरीच्या जीनच्या अभिव्यक्तीत कमी सक्रियता दिसली. तसेच मेंदुच्या कार्य प्रणालीसाठी याची सक्रियता आवश्यक आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

1 thought on “नैराश्य व तणावाने मेंदु अंकुचणाचा धोका”

Leave a Comment