एका सिनेमात दोन नायिका असल्या तर त्यांच्यात कुठल्या ना कुठल्या कारणावरून मतभेद होतातच हा आजपर्यंतचा अनुभव आहे. त्यामुळे बॉलीवूडसाठी ही घटना काही नवखी नाही. गेल्या काही दिवसापासून रितिक रोशनच्या ‘कृष-३’ सिनेमाचे शूट सुरु आहे. यामध्ये प्रियंका चोप्रा व कंगना राणावत यांच्या प्रमुख भूमिका आहेत. शूटच्या वेळी प्रियंका-कंगनात एकाच ड्रेस घालण्यावरून ‘तु तु मै मै’ झाल्याने शेवटी दोघींना ही तोच ड्रेस आणल्यानंतर त्यांच्यातील वाद मिटला.
रितिक रोशनच्या ‘कृष-२’ चा ‘कृष-३’ हा सिक़्वेल आहे. या सिनेमात रितिक रोशन ट्रिपल रोल करीत असून हिरोईन म्हणून प्रियंका-कंगनाची निवड त्याने केली आहे. सिनेमाचे शूट सध्या सुरु आहे, मात्र प्रियंका व कंगनाच्या फॅशनमुळे मात्र सिनेमातील सहकार्यांना तारेवरची कसरत करावी लागता आहे. एका सीनसाठी दोघींना एकाच ड्रेस हवा असल्याने फॅशन डिझायनर मनिष मल्होत्राची मात्र चांगलीच पंचाईत झाली. कितीतरी समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र दोघीही आपल्या निर्णयावर ठाम असल्याने मनीषला दोघीसाठी एक सारखाच ड्रेस तयार करावा लागला. त्यानंतरच पुढचे चित्रीकरण पार पडले.