चांगल्या स्क्रिप्टमुळे कमबॅक – श्रीदेवी

दिग्दर्शक गौरी शिंदे हिच्या ‘इंग्लिश विग्लीश’ सिनेमातून १५ वर्षाच्या विश्रांतीनंतर श्रीदेवीने पुन्हा दुसऱ्या इनिंगला सुरुवात केली आहे. या सिनेमाचे ट्रेलर पहिल्यानंतर तिची अॅक्टिंग व फिटनेस सध्याच्या सर्वच अभिनेत्रीना टक्कर देणारा आहे.

या सिनेमात श्रीदेवीने एक मध्यमवर्गीय वयाच्या शशी नामक महिलेचा रोल साकारला आहे. या रोलबाबत श्रीदेवी म्हणाली, ‘ माझा रोल हा लाडू तयार करण्यात तरबेज असलेल्या महिलेचा असून तिला इंग्रजी बोलता येत नसते. तिचा पती व मुले तिची इंग्लिश सुधारण्यासाठी सतत प्रयत्न करीत असतात. एके दिवशी तिची भाची येते आणि तिला अमेरिकेला घेऊन जाते. त्याठिकाणी शशी इंग्लिशची ट्यूशन घेते असे सिनेमाचे कथानक आहे.’

या सिनेमातून परतण्यामागचे कारण विचारले असता श्रीदेवी म्हणाली, ‘ गौरीने लिहलेले स्क्रिप्ट मला आवडले. त्यामुळेच मी पुन्हा सिनेमात कमबॅक करण्याचे ठरविले. या चित्रपटातील भूमिका मी करियरमध्ये कधीपण करू शकले असते. पहिल्यांदाच मी एक महिला दिग्दर्शकासोबत काम करीत आहे. हा माझ्यासाठी एक वेगळा अनुभव आहे.’