ऑलिम्पिक पदक विजेत्यांचे स्वागत

नवी दिल्ली: ऑलिम्पिक स्पर्धेत पदक प्राप्त करणार्‍या खेळाडूना क्रीडा मंत्रालयाच्या वतीने गौरविण्यात आले. मल्ल सुशीलकुमार, युगेश्वर दत्त, नेमबाज गगन नारंग, विजय कुमार, सायना नेहेवाल आणि सुपर मॉम मेरी कोम यांचा केंद्रीय क्रीडामंत्री अजय माकन यांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला.

रौप्य पदक विजेते सुशील कुमार आणि विजय कुमार यांना प्रत्येकी ३० लाख तर मेरी कोम, सायना नेहेवाल, गगन नारंग आणि योगेश्वर दत्त या कांस्य पदक विजेत्यांना प्रत्येकी १० लाख रुपये देऊन गौरविण्यात आले.

सन २०२० च्या ऑलिम्पिक मध्ये भारतीय खेळाडू २५ पदके जिंकतील हे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचे माकन यांनी यावेळी सांगितले.

Leave a Comment