‘एक था टायगर’ बॉक्स ऑफीसवरचा दबंग

मुंबई: ‘एक था टायगर’ने पहिल्याच दिवशी ३० कोटीचा गल्ला जमवून सलमान हा बॉलीवूडचा दबंग असल्याचे दाखवून दिले आहे. स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने चांगली सलामी दिली आहे.

अनेक चित्रपटगृहात ‘एक था टायगर’च्या गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवारचे बुकींग झाले असून या दिवसातले अनेक खेळ आताच ‘हाउस फुल’ झाले आहेत. पुढच्या पाच दिवसात हा चित्रपट १०० कोटीची कमाई करेल; असा अंदाज जाणकार व्यक्त करीत आहेत.

बॉलीवूडमध्ये सलमान खान या एकमेव अभिनेत्याच्या तीन चित्रपटांनी बॉक्स ऑफीसवर १०० कोटीची कमाई केली आहे. या पूर्वी दबंग आणि बॉडीगार्ड या चित्रपटांनी ही कामगिरी केली आहे.