राज्यात तीन दिवसीय दुखवटा; शासकीय कार्यक्रम रद्द

मुंबई,१५ ऑगस्ट – राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञानमंत्री विलासराव देशमुख्यांच्या निधनानिमित्त राज्यात तीन दिवसांचा दुखवटा पाळण्यात येणार आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेले सर्व शासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

स्वातंत्र्यदिनानिमित्त राष्ट्रध्वज पूर्ण उंचीवर फडकविण्यात येईल. मात्र, त्यानंतर १६ ऑगस्टला पुन्हा राष्ट्रध्वज अर्ध्यावर खाली आणण्यात येणार आहे. 

 

Leave a Comment