ऑलिंपिक ध्वज रियोत दाखल, प्रतीक्षा २०१६ ची

रियो डी जिनारियो, १५ ऑगस्ट –  लंडनचा निरोप घेतल्यानंतर ऑलिंपिक ध्वज आता २०१६ ऑलिंपिकचा यजमान रियो डी जिनारियोत पोहोचला आहे.

ब्राझीलमधील अधिकार्यांना येथे खेळाच्या हा महाकुंभ यशस्वी पार पाडण्याचा विश्वास आहे रियोचे महापौर एडुआर्डो पेस, २०१६ ऑलिंपिकचे अध्यक्ष कार्लोस आर्थर नुजमान आणि रियोचे गवर्नर सर्जियो काबराल लंडनहून या प्रसिद्ध ऑलिंपिक ध्वजासह रियोत पोहोचले.

महापौर पेस यांनी विमानातून उतरल्यानंतर सांगितले की, ध्वजाचे रियोत येणे या गोष्टीचे संकेत आहेत की, आता रियो एक नव्या बदलाच्या दिशेने पाऊल टाकणारे आहे.ही बाब ब्राझीलसाठी एक अभिमानाची आहे. याचा जल्लोश येणार्या काळात प्रत्येकजण साजरा करेल. दुसरीकडे ज्या जहाजाने ध्वज आणण्यात आला त्यातच लंडन ऑलिंपिकमध्ये सहभागी ब्राझीली ऍथलीटदेखील होते आणि सर्वांनी हा क्षण अत्यंत महत्त्वाचा असल्याचे सांगितले.

ब्राजील आणि विशेषतः रियोसाठी हे आव्हान खूप आव्हानात्मक राहील. रियो वाईट वाहतूक, वाईट शहरी व्यवस्था आणि शहरी हिंसाचाराने ग्रस्त आहे. अशात हा देश २०१६ ऑलिंपिक आणि त्याआधी २०१४ च्या फीफा विश्व कप स्पर्धेची यजमानी करणार आहे. त्यामुळे निश्चितच ब्राझिलसाठी हे आव्हान कठिण राहील. 

Leave a Comment