सुनील दत्तच्या लूकमध्ये दिसणार संजय दत्त

संजय दत्त ‘सन ऑफ सरदार’ या आगामी चित्रपटात त्याचे वडील सुनील दत्त यांच्या लूकमध्ये दिसणार आहे. सुनील दत्तने १९६३ साली ‘मुझे जीने दो’ या चित्रपटात साकारलेला रोल या चित्रपटात संजय साकारणार आहे.

अर्थात संजयने ‘सन ऑफ सरदार’ चित्रपटची ऑफर स्वीकारली तेंव्हा आपला या सिनेमातील रोल काय असेल याची त्याला काही कल्पना नव्हती. या सिनेमाची निर्मिती त्याचा मित्र अजय देवगण करत असल्याने रोल विषयी काहीही न विचारताच संजयने होकार दर्शविला होता. काही दिवसापूर्वीच प्रदर्शित झालेल्या ‘अग्निपथ’ मधील संजयचा वेगळा लूकमुळे चर्चेचा विषय ठरला होता.सन ऑफ सरदार साठी अजय देवगण व दिग्दर्शक अश्विन धीर संजयच्या वेगळ्या लूक बाबत विचार करत होते तेव्हा संजयनेच वडिलाचा रोल करण्याचा प्रस्ताव त्यांच्या समोर ठेवला होता. तो सर्वांनाच आवडल्याने तो आता सुनील दत्त यांच्या लूकमध्ये झळकणार आहे.

या सिनेमाचे सध्या शुटिंग सुरु असून संजयचा लूक पाहून अनेकांना सुनील दत्ताची आठवण झाली. हा सिनेमा १३ नोव्हेंबरला रिलीज होणार आहे.

Leave a Comment