पाक संघातून युनिस खान, गुलला वगळले

ऑस्ट्रेलिया सोबत संयुक्त अरब अमिरतीत खेळल्या जाणाऱ्या मालीकेसाठी १६ सदस्यांच्या पाक संघाची घोषणा आज करण्यात आली. या संघातून अनुभवी फलंदाज युनिस खान व जलदगती गोलंदाज उमर गुलला वगळण्यात आले आहे.

पाकिस्तान व ऑस्ट्रेलिया संघादरम्यान या सिरीजचा पहिला सामना २८ ऑगस्ट रोजी शारजाहमध्ये खेळला जाणार आहे. काही दिवसापूर्वी झालेल्या श्रीलंका दौऱ्यावेळी पाक संघातून जलदगती गोलंदाज मोहमद सामी आणि राहत अली आणि विकेट किपर सर्फराज अहमद यांना वगळण्यात आले होते.

पाक संघाच्या निवड समितीने कर्णधार म्हणून मिसबाह-उल-हकला कायम ठेवले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या मालिकेसाठी पाक संघात स्थान मिळविण्यात माजी कप्तान शोएब मलिक व विकेट किपर कामरान अकमल हे दोघेजण यशस्वी ठरले. त्या सोबतच ऑस्ट्रेलिया सोबतच्या ट्वेंटी२० सिरीजसाठी वा आगमी काळात होत असलेल्या ट्वेंटी२० विश्वचषकासाठी पाकिस्तानच्या संघात जलदगती गोलंदाज जुनेद खान व अन्वर अली या दोघांनी संघात पुन्हा स्थान मिळवले आहे.

Leave a Comment