अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार

नागपूर: अल्पवयीन विद्यार्थिनीला शस्त्राचा धाक दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार करणार्या नराधमाला पोलिसांनी अटक केली आहे.

विजय असे या नराधमाचे नाव असून तो या पिडीत मुलीच्या शेजारीच आपली पत्नी आणि २ वर्ष वयाच्या मुलीसोबत नंदनवन परिसरात राहतो. ही मुलगी ९ वीत शिकत आहे. तिचे विजयाच्या घरी येणे जाणे होते. तिच्या घरचे सर्वजण परगावी गेले असता दि. ८ जुलै रोजी तिला एकटे गाठून विजयने तिच्यावर बलात्कार केला. कोणाला सांगितले तर जीवे मारण्याची धमकीही दिली. त्यानंतरच्या रविवारी ती आणि तिचा लहान भाऊ हे दोघेच घरात असताना विजयने तिथे येऊन लहान भावाला बाहेर पाठविले आणि धारदार शस्त्राचा धाक दाखवून पुन्हा तिच्यावर अत्याचार केला. अशाच प्रकारे तीन वेळा त्याने तिच्यावर बलात्कार केला.
या पाशवी अत्याचारामुळे तिला सोमवारी असह्य वेदना होऊ लागल्याने तिने घडलेला प्रकार आपल्या पालकांना कथन केला.

त्यानी दिलेल्या तक्रारीनुसार विजयला अटक करून नागपूर पोलीस पुढील तपास करीत आहेत.