मुंबई: कुख्यात दहशतवादी अबू जुन्दाल याची विनंती मान्य करून न्यायालयाने अबूला त्याच्या आईला भेटण्याची परवानगी दिली आहे.
अबू जुन्दाल आईला भेटणार
अबूला दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली असून सध्या मुंबईवरील २६/११ च्या हल्ल्याबाबत मुंबई पोलिसांचे दहशतवाद विरोधी पथक त्याची चौकशी करीत आहे.
त्याने आपल्या आईला भेटण्याची परवानगी न्यायालयाला मागितली होती. विशेष म्हणजे दोन महिन्यापूर्वी पत्रकार परिषदेत बोलताना त्याच्या आईने अबू हा आपला मुलगा असल्याचे नाकारले होते.
अबू हा मूळचा बीड येथील कागजी वेस भागात राहणारा आहे. वेरूळ येथे सन २००६ मध्ये मोठा शस्त्रसाठा सापडल्यापासून तो फरार होता.
