मी नाही बाई स्टायलिश – सोनम कपूर

मसक्कली गर्ल सोनम कपूरला फेंशनचा आयकॉन समजण्यात येते. ती सारखीच काही ना काही नवीन स्टायलिश ट्रेंड आणण्याचा प्रयत्न करीत असते. तिच्यामुळे आज इंडस्ट्रीत वेस्टर्नपासून इस्टर्नपर्यंत बऱ्याच फैशन आल्या आहेत असे बोलले जात असले तरी सोनम कपूर मात्र स्टायलिश नसल्याचा दावा करीत आहे.

सोनमने आता पर्यन्त पँटस, स्कर्टसपासून ते जंपसुटपर्यंत सर्व प्रकारचे स्टायलिश गारमेंट ट्राय केले आहेत. इतकेच नव्हे तर फैशन आयकॉन म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यात ती यशस्वी ठरली आहे. कान्स महोत्सवाप्रसंगी तिने परिधान केलेला ड्रेस चर्चेचा विषय ठरला होता.

या बाबत सोनम म्हणते, ‘ मी बिलकुल स्टायलिश नाही. मी ब्रांडेड कपडे वापरत असल्याने, कदाचित मी स्टायलिश आहे असे सर्वाना वाटत असेल. सध्या तरी माझ्या टिपिकल रोलला व इवेंटला शोभेल अशीच फैशन करते.’