सैफ अली खानचा १६ ऑगस्ट रोजी वाढदिवस आहे. लग्नाच्यापूर्वीचा हा सैफचा शेवटचा वाढदिवस असणार आहे. त्यामुळेच करीनाने हा वाढदिवस वेगळ्या पद्धतीने लंडनमध्ये सेलेब्रिट करण्याचे ठरविले आहे. सैफिनाने या वर्षाअखेरपर्यंत लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.

सूत्राने दिलेल्या माहितीनुसार सैफ–करीनाने लंडनमध्ये पाच दिवसाचा हॉलिडे प्लॅन तयार केला आहे. बेबोने त्यासाठी ‘हिरोइन’च्या डबिंगच्या बिझी शेडयुलमधून सुट्टी घेतली आहे. तर सैफने ‘गो गोवा गॉन’च्या मॉरीशिस मध्ये सुरु असलेल्या शेडयुलमधून ऑफ घेतला आहे.
लंडन सैफ आणि करिनासाठी नेहमीच आवडते ठिकाण राहिले आहे. काही दिवसापूर्वीच लंडनबदल बोलताना करीनाने ‘लंडनमध्ये प्राइव्हसी मिळते, येथे रस्त्यावरून फिरता येते, थीएटरमध्ये सिनेमा मुक्तपणे एन्जॉय करता येतो असे सांगितले होते.
पुढच्या महिन्यात २१ सप्टेंबरला करीनाचा वाढदिवस आहे. आता हा वाढदिवस कसा साजरा होणार याची अनेकांना उत्सुकता आहे कारण कारीनाचाही हा लग्नापूर्वीचा शेवटचा वाढदिवस असेल.