ऑलिम्पिकमध्ये भारताच्या नावावर पाच पदकांची सर्वोत्कृष्ट कामगिरी

लंडन, दि.१३ – लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताच्या नावावर आता पाच पदकं जमा झाली आहेत. एकाच ऑलिम्पिकमध्ये जास्त पदकं मिळवण्याबाबत भारताची आतापर्यंतची ही सर्वात्कृष्ट कामगिरी ठरली आहे. 

लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताने आतापर्यंत १ रौप्य, तर चार कांस्यपदके मिळवली.

लंडन ऑलिम्पिकमध्ये पहिल्या पदकाची सुरुवात केली ती नेमबाज गगन नारंगने. नारंगने १० मीटर एअर रायफल कांस्यपदक पटकावले.

त्यापाठोपाठ नेमबाज विजय कुमारने २५ मीटर रॅपिड फायर प्रकारात रौप्य पदक जिंकले. 

भारताला तिसरे पदक मिळवून दिले ते फुलराणी सायना नेहवालने. बॅडमिंटनच्या महिला एकेरीत सायनाने कांस्यपदक पदक मिळवून दिले. ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटन प्रकारात भारताचे हे पहिलेच पदक ठरले.

त्यानंतर बॉक्सिंग क्वीनने मेरी कोमने भारताच्या नावावर चौथे पदक जमा केले. ऑलिम्पिकमध्ये यंदा पहिल्यांदाच महिला बॉक्सिंगचा समावेश करण्यात आला होता. ५१ किलो वजनी गटात मेरी कोमने कांस्यपदक मिळवले. 

 योगेश्वर दत्तने कांस्यपदक जिंकून भारताला पाचवे पदक मिळवून दिले. 

याआधी २००८च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये भारताला एकूण तीन पदकांची कमाई करता आली होती. पण त्यात अभिनव बिंद्राच्या वैयक्तिक सुवर्णपदकाचाही समावेश होता. 

 

Leave a Comment