हमीद अन्सारी पुन्हा उपराष्ट्रपतीपदी विराजमान

नवी दिल्ली: भारताचे तेरावे उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी शनिवारी शपथ ग्रहण केली. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यानंतर सलग दुसर्‍यांदा हे पद भूषविण्याचा मान त्यांना मिळाला आहे.

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी अन्सारी यांना पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि काही मंत्री उपस्थित होते.

अन्सारी यांनी प्रथम २००७ मध्ये उपराष्ट्रपती पदाची जबाबदारी स्वीकारली. त्यावेळी त्यांनी नजमा हेपतुल्ला यांचा पराभव केला. या निवडणुकीत त्यांनी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते जसवंतसिंग यांना पराभूत केले. अपेक्षेप्रमाणे ही निवड एकतर्फीच झाली.

Leave a Comment