
अनुष्का शर्माने अल्पावधीतच बॉलीवूडमध्ये चांगली लोकप्रियता मिळवली आहे. सध्या तिच्याकडे बड्या निर्मात्यांची रांग लागली आहे. काही दिवसापूर्वीच तिने दिग्दर्शक राजकुमार हिरानीचा ‘पीके’ हा सिनेमा साइन केला आहे. तसेच अनुराग कश्यपचा बॉम्बे वेलवेट हा सिनेमा स्वीकारला असून यात अनुष्का रणबीर कपूर सोबत लीड रोल करणार आहे. या सिनेमामध्ये अनुष्काला घेण्याची शिफारस रणबीरने केली असल्याने दीपिका, कैटरीनानंतर आता त्याची नजर अनुष्काकडे वळली आहे असे म्हटले तर ते गैर ठरू नये.
