जन्माष्टमीच्या मुहूर्तावर मोबाईल गेमचे प्रकाशन

नवी दिल्ली दि.१० – कृष्ण आणि कंस या चित्रपटावरून प्रेरणा घेऊन जेम्स गेम्स  कंपनीने तयार केलेला नवीन मोबाईल गेम शुक्रवारी सादर करण्यात आला असून रिलायन्स अॅनिमेशनच्या सहकार्याने हा गेम तयार करण्यात आला आहे.

कृष्ण आणि कंस हा सिनेमा तीन ऑगस्टला प्रदर्शित झाला आहे. आज जन्माष्टमी असून त्याचे निमित्त साधूनच या नवा मोबाईल गेम आबालवृद्धांसाठी उपलब्ध करून दिल्याचे जेम्स गेम्सच्या अधिकार्‍यांनी सांगितले. ते म्हणाले हा गेम खेळणारा कुणीही स्वतः कृष्ण बनून राक्षसांनी ज्या गावकर्‍यांची मुले राक्षसांनी पळवून नेली आहेत त्यांची सुटका राक्षसांच्या तावडीतून करण्यासाठी त्या गावकर्‍यांना मदत करू शकणार आहेत. मोबाईलच्या माध्यमातून साकारायला मिळणार्‍या कृष्णाच्या भूमिकेचा आनंद यातून युजरला मिळू शकणार आहे.

रिलायन्स अॅनिमेशनचे सीईओ एस.के. आशिष म्हणाले की हा गेम तयार करताना भारतीय संस्कृतीतील या महान पात्राविषयीची भारतीय मनातील भावना अधिक संवेदनशील होईल अशी काळजी घेण्यात आली आहे. देशभर जन्माष्टमीचा उत्सव साजरा होत असताना आम्ही या प्रकारे या उत्सवात सहभागी होत आहोत. हा गेम अँड्रोईड, ब्लॅकबेरी, संबियन अशा सर्व मोबाईल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देण्यात आला आहे.

Leave a Comment