सुरक्षा रक्षकानेच केला तरुणीचा खून

मुंबई: दिल्लीस्थित आयएएस अधिकार्‍याच्या मुलीचा खून तिच्या घरात राहणार्‍या सुरक्षारक्षकानेच केल्याचे उघड झाले आहे. खून करण्यापूर्वी सुरक्षारक्षकाने तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्नही केला.

व्यवसायाने वकील असलेली पल्लवी पुरकायस्थ ही मुंबईतील वडाळा येथे हिमालयीन टॉवरमध्ये तिचा ‘लिव्ह इन’ जोडीदार अविक सेनगुप्ता याच्यासह रहात होती. तिचा गुरुवारी गळा चिरून खून करण्यात आला.

पल्लवीच्या घरात सुरक्षा रक्षक म्हणून काम करीत असलेल्या सज्जाद याने तिच्या घरात चोरीच्या उद्देशाने प्रवेश केला. पल्लवी घरात एकटी असल्याचे पाहून त्याने तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिच्या प्रतिकाराने तो निष्फळ ठरला. यावेळी सज्जादने स्वयंपाकघरातील सुरीने गळा चिरून पल्लवीचा खून केला.

सज्जादने आपल्या गुन्ह्याची कबुली दिल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले.

Leave a Comment