’सॉरी, ’सुवर्ण’ आणू शकले नाही’

लंडन, ९ ऑगस्ट-भारताची बॉक्सिंग चॅम्पियन मेरी कोम हिने ’मी सुवर्णपदक जिंकू शकले नाही, त्यामुळे भारतीयांची क्षमा मागू इच्छिते,’ अशी प्रतिक्रिया व्यत्त* केली आहे.

मेरीला लंडन ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत ग्रेट ब्रिटनच्या निकोला ऍम्स हिच्याविरुद्ध ११-६ अशा फरकाने पराभव पत्करावा लागला. यामुळे तिची सुवर्णपदक पटकावण्याची संधी गेली असली तरी, कांस्यपदक राखण्यात ती यशस्वी ठरली आहे.

मेरी म्हणाली, ’मायदेशातून मला भारावून टाकणारे पाठबळ मिळाले. मी एवढेच म्हणू शकते की, मी माझ्या परीने निकराचे प्रयत्न केले. तथापि, किमान एक पदक आणता आले त्याबद्दल मी आनंदी आहे.’