विजय कुमार आणि गगन नारंगला बक्षीस जाहीर

नवी दिल्ली, दि.९ – लंडन ऑलिंपिकमध्ये भारताला नेमबाजीत रौप्यपदक आणि कांस्यपदकाची कमाई करुन देणार्या विजय कुमार आणि गगन नारंग यांचे मायदेशी जंगी स्वागत करण्यात आले. नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियाने विजय कुमारला २० लाख रुपयांचे तर गगन नारंगसाठी १५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले. 

नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष रायंदर सिंग यांनी या संबंधीची घोषणा केली. या दोघांनाही पारितोषिकाची रक्कम लवकरच देण्यात येईल, असे रायंदर सिंग यांनी सांगितले. विजय कुमारने २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल प्रकारात रौप्य पदक जिंकले आहे, तर गगन नारंगने १० मीटर एअर रायफल प्रकारात कांस्यपदक मिळवले आहे.