नासाने धाडलेले क्युरिओसिटी यान मंगळावर सुरक्षित उतरले असून त्याची कामगिरीही त्याने सुरू केली आहे. मंगळाचे उत्तमोत्तम फोटो हे यान नासाकडे पाठवू लागले आहे. परग्रहावर आत्तापर्यंत सोडण्यात आलेल्या यानातील हे सर्वात अत्याधुनिक यान असून विशेष म्हणजे ते स्मार्टफोनला पॉवर देण्यासाठी जेवढी बॅटरी लागते, त्याच्या निम्म्या पॉवरमध्येच काम करते आहे असे सांगण्यात येत आहे.
क्युरिऑसिटीला लागतेय स्मार्टफोनच्या निम्मीच पॉवर
नासाच्या या ९०० किलो वजनाच्या यानाचे नियंत्रण ज्या संगणकाकडे आहे त्याचा प्रोसेसिंग स्पीड २०० मेगाहर्स्टस इतकाच आहे. हा स्पीड सध्या आयफोनला लागणार्या पॉवरच्या निम्माच आहे. शिवाय याच पॉवरवर रोव्हरवरबसविलेली दहा वैज्ञानिक उपकरणे आणि उच्च दर्जाच्या प्रतिमा घेणारे १७ कॅमेरेही चालत आहेत. कॅनबेरा डीप स्पेश कम्युनिकेशनच्या ग्लेन नगलने तर मंगळाच्या सुंदर फोटोंसाठी क्युरीआसिटी आमच्या कायम स्मरणात राहिल असे म्हणले आहे. या यानाच्या तीन अँटेनांचे नियंत्रण कॅनबेरा स्पेसकडे आहे.
