अव्वल स्थानावरून ऑस्ट्रेलियाची घसरण

वनडेच्या जागतिक क्रमवारीतील नंबर एकचे स्थान इंग्लंड संघाने काबीज केले आहे. यापूर्वी जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या टीम ऑस्ट्रेलियाची चौथ्या स्थानावर घसरण झाली आहे. दक्षिण आफ्रिका १२१ गुण घेऊन दुसऱ्या तर भारत सध्या १२० गुण घेऊन रेटिंगमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. २००२ साला पासून ऑस्ट्रेलियाची पहिल्यांदाच एवढ्या खालच्या स्थानावर घसरण झाली आहे. नवीन क्रमवारी ऑगस्ट २०१० नंतरच्या सामन्याच्या आधारे तयार करण्यात आली आहे.

जागतिक क्रमवारीची ही घोषणा नव्याने करण्यात आली आहे. यापूर्वी या क्रमवारीत ऑगस्ट २००९ ते जुलै २०१० पर्यंतच्या सामन्याचा समावेश करण्यात आला होता. आता नवीन क्रमवारीत ऑगस्ट २०१० नंतरच्या सामन्याचा समावेश करण्यात आला आहे. राँकिगमध्ये प्रत्येक वर्षी अशा प्रकारचा बदल केल्यामुळे टीमचा सध्याचा परफॉर्म समजून येतो. त्यामुळे अशास्वरूपाचा बदल करण्यात आला आहे.

त्यानंतरच्या स्थानात कोणताही बदल झालेला नाही. पाचव्या स्थानी श्रीलंका, सहाव्या स्थानी पाकिस्तान, सातव्या स्थानावर वेस्टइंडीज, आठव्या स्थनावर न्यूझीलंड तर नवव्या स्थानावर बांगलादेश आहे. त्यासोबतच ट्वेंटी २० च्या क्रमवारीत दक्षिण आफ्रिका पहिल्या नंबरवर आहे तर भारत हा इंग्लंड व श्रीलंकानंतर चौथ्या नंबरवर आहे.