इम्रानखानला ठार करण्याची तालिबान्यांची धमकी

शावल दि.९ – पाकिस्तानी क्रिकेटपटू आणि गेली दहा वर्षे राजकारणात असलेला इम्रानखान याने वझिरीस्तानमध्ये अमेरिकन ड्रोन हल्ल्याचा निषेध करण्यासाठी मोर्चा काढला तर त्याला आमचे आत्मघातकी बॉम्ब ठार करतील असा इशारा तालिबानी संघटनेने दिला आहे. त्याचबरोबर निवडणुकांत सामील होणाऱ्यांवरही हल्ले करण्याचा आमचा निश्चय आहे असे तालिबानी प्रवक्ता अह्सनुल्ला अहसान याने जाहीर केले आहे.

तो म्हणाला की आमचे अनेक लढवय्ये ड्रोन हल्ल्यात ठार झाले आहेत. आमचाही या हल्ल्यांना विरोध आहे.पण इम्रान स्वतःला सुधारणावादी म्हणवतो आणि हे इस्लामच्या विरोधात आहे. इम्रानने हजारो समर्थकांसह अफगाण सीमेवर ड्रोन हल्ले विरोधात मोर्चा काढणार असल्याचे जाहीर केल्यानंतर त्याला हा इशारा देण्यात आला आहे.

पाकिस्तानातील अनेक जणांनी मात्र तालिबानी धमकी बद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे कारण इम्रान आजपर्यंत नेहमीच सरकार आणि अमेरिका संबंधावर टीका करत आला आहे मात्र तालिबानी संघटनेच्या विरोधात तो कधीच बोललेला नाही. त्यामुळे त्याला तालिबान खान असेही उपरोधाने संबोधले जाते. पाकिस्तानला १९९२ साली क्रिकेटचा  वल्ड कप जिंकून दिल्यापासून इम्रानची लोकप्रियता वाढली आहे. त्यातूनच त्याने राजकारणात येऊन जस्टीस परतीची स्थापना केली आहे .

Leave a Comment