
नवी दिल्ली, दि. ८ – स्पेक्ट्रम लिलावासाठी आता आणखी वेळ लागण्याची शक्यता आहे. यासाठी मुदतवाढ मिळण्यासाठी सरकार सर्वोच्च न्यायलयाला विनंती करणार असल्याचे समजत आहे. स्पेक्ट्रम लिलावाची प्रक्रिया ऑगस्ट अखेरपर्यंत पूर्ण करावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने सरकारला दिले होते.
